गौतम गंभीरने त्याच्या दुसऱ्या मुलीचे नाव ठेवले ‘अनायझा’

कोलकाता नाईट राईडरचा कर्णधार गौतम गंभीरने बुधवारी आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव ट्विटर वरून घोषित केले. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये गंभीरची पहिली मुलगी ‘आझीन’ हिने तिच्या छोट्या बहिणीला कुशीत घेतले आहे.

हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गंभीर कुटुंबावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. त्याचवेळी ‘अनायझा’ हे नाव खूप वेगळे असून अनायझा नावाचा नक्की अर्थ काय होतो हा प्रश्न गंभीरला त्याच्या चाहत्यांकडून विचारला जातोय.

गौतम गंभीरचे लगान २०११ साली नताशा बरोबर झाले होते. ह्या दाम्पत्याने मे २०१४ मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला. सध्या गौतम गंभीर इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट राईडरचा कर्णधार आहे. त्याचा नेतृत्वाखाली शाहरुख खानच्या कोलकाताने टीमने दोनदा (२०१२ आणि २०१४) विजय मिळवला. त्याने आयपील कारकिर्दीत १४८ सामन्यात ३१. ५४च्या सरासरीने ४१३२ धावा केल्या आहेत.