गौतम गंभीरने केले एमएस धोनीचे कौतुक, जाणून घ्या कारण

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने भारतीय सेनेबरोबर वेळ घालवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने त्याचे कौतुक केले आहे. गंभीरने धोनीचे कौतुक करताना असेही म्हटले आहे की या निर्णयामुळे युवांना भारतीय सेनेत भरती होण्याची प्रेरणा मिळेल.

पूर्व दिल्लीचा खासदार गंभीरने एबीपी न्यूज चॅनेलला सांगितले की ‘आर्मीत सामील होण्याचा धोनीचा निर्णय शानदार आहे. मी याआधीही खूपदा म्हटलो आहे की जर धोनीने गणवेश (भारतीय सैन्याचा गणवेश) तेव्हाच घातला पाहिजे जेव्हा तो भारतीय सेनेबरोबर वेळ घालवेल आणि आता त्याने सेनेबरोबर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘त्याने त्याचे भारतीय सेनेसाठी असलेले समर्पण सिद्ध केले आहे. धोनीचे हे पाऊल हजारो युवकांना भारतीय सेनेत भरती होण्यासाठी प्रेरणा देईल.’

भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेल्या धोनीने क्रिकेटमधून दोन महिन्यासाठी ब्रेक घेतला आहे. तसेच त्याने भारतीय क्रिकेट संघांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे आधीच बीसीसीआयला कळवले होते. तो हा दोन महिन्याचा वेळ भारतीय सैनेबरोबर घालवणार आहे.

या दरम्यान तो पॅराशुट रेजिमेंटबरोबर कश्मीर व्हॅलीमध्ये 31 जूलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्यूटूी या जबाबदाऱ्या निभावेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ठरंल! हे तीन दिग्गज करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या १४ खेळाडूंचा झाला विंडीजच्या संघात समावेश

अखेर मोहम्मद शमीला या देशात जाण्याचा व्हिजा मिळाला