गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!

भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यापूर्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी काल नवदिप सैनीची भारतीय संघात निवड झाली आहे.

याच निवडीवरून गौतम गंभीरने डीडीसीएचे तत्कालीन उपाध्यक्ष चेतन चोैहान आणि सदस्य बिशन सिंग बेदी यांचावर ट्विटरवरुन जोरदार निशाना साधला आहे.

गंभीरने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, “डीडीसीए सदस्य चेतन चौहान आणि बिशन सिंग बेदी याच्याबद्द्ल मला सहानुभूती आहे. नवदिप सैनी या ‘बाहेरच्या’ खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे. मला कळाले आहे की, बेंगलोरमध्ये 225 रूपयात काळे आर्मबॅन्ड मिळत आहेत.सर, पण हे लक्षात घ्या नवदिप पहिला भारतीय आहे आणि नंतर प्रादेशिक.”

गौतम गंभीरने हे ट्वीट करण्यामागे कारण असे आहे की, 2013 साली हरीयाणाच्या नवदिप सैनीचा दिल्ली रणजी संघात समावेश करवा यासाठी गंभीरने प्रस्ताव मांडला होता. त्यावर नवदिप बाहेरचा (हरीयाणाचा) आहे त्याला दिल्ली संघात का घ्यायचे ? असे मत डीडीसीए सदस्य बिशन सिंग बेदी आणि चेतन चौहान यांनी मांडून नवदिपच्या निवडीला विरोध केला होता.

बिशन सिंग बेदी आणि चेतन चौहान यांच्या विरोधानंतरही नवदिपच्या निवडीवर ठाम राहून  तत्कालीन कर्णधार गंभीरने डीडीसीएला नवदिप सैनीची दिल्ली संघात निवड करण्यास भाग पाडले होते.

नवदिप सैनीने 2013-2018 या काळात दिल्लीकडून खेळताना 31 सामन्यात 20.04 च्या सरासरीने 96 बळी मिळवले आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमधिल या कामगिरीमुळे नवदिप सैनीची भारतीय संघात निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!