मॅच फिक्सिंगमध्ये आडकलेल्या खेळाडूला बेल वाजवण्याचा मान दिल्याने गौतम गंभीर नाराज

कोलकता। रविवारी (4 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात इडन गार्डन स्टेडीयमवर पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्याआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला इडन गार्डनवरिल बेल (घंटा) वाजवण्याचा मान देण्यात आला होता.

मात्र या गोष्टीवर भारतीय फलंदाज गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने याबद्दल ट्विट करुन बीसीसीआय, सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेली समिती (सीओए) आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनवर टीका केली आहे.

गंभीरने ट्विटमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच बेल वाजवण्याचा सन्मान दिल्याने आश्चर्य करताना म्हटले आहे की जरी भारतीय संघ जिंकला असला तरी बीसीसीआय, सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेली समिती (सीओए) आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन पराभूत झाले आहेत.

अझरुद्दीनवर 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने बंदीही घातली होती.

अझरुद्दीनने रविवारी पहिल्या टी20 आधी भारत आणि विंडीज यांचे राष्ट्रगीत झाल्यानंतर इडन गार्डनवरील बेल वाजवली होती.

त्यांनी 1984 मध्ये इडन गार्डन स्टेडीयमवरच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा

जे कोणत्याही कर्णधाराला जमले नाही ते रोहित शर्माने करुन दाखवले

पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा विंडिजवर ५ विकेट्सने विजय