विश्वचषकात खेळणाऱ्या त्या ११ खेळाडूंबद्दल कोहलीचा मुद्दा गंभीरने खोडून काढला

बुधवारी(13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताला 35 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिकाही भारताने 2-3 अशा फरकाने गमावली. त्यातच विश्वचषक दोन महिन्यावर आला असताना हा पराभव झाल्याने भारतीय संघावर टिका होत आहे.

तसेच या पराभवामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन यांच्या अंतिम 11 जणांच्या संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यात आता भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही विराटचा एक मुद्दा खोडून काढला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या सामन्याआधी विराट म्हणाला होता की या सामन्यातील अंतिम 11 खेळाडूंचे मिश्रण हे 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी उत्तम आहे.

या सामन्याच्या नाणेफेकी वेळी विराट म्हणाला की ‘आज जे संघात मिश्रण आहे, तेच साधारण विश्वचषकात खेळताना असणार आहे. तसेच आम्ही यातून संघाचा समतोल राखू.’

विराटच्या या मुद्द्यावर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना गंभीर म्हणाला, ‘मला वाटते की अंतिम संघाचा अजून निर्णय व्हायचा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेनंतर आयपीएल आहे.’

‘मला वाटत नाही की या संघाबाबत काही शंका आहे पण मी खात्री देऊ शकतो की हा भारताचा सर्वोत्तम 11 जणांचा अंतिम संघ असू शकत नाही.’

‘विराटने म्हटले आहे की अशाच प्रकारचा संघ विश्वचषकासाठी खेळवला जाणार आहे. पण हा 11 जणांचा संघ हवा तेवढा विश्वास देत नाही. जरी यात तूम्ही एमएस धोनीचा समावेश केला तरीही. तूम्हाला या संघात फलंदाजांची खोली दिसून येत नाही.’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारतीय संघात विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा हे मुख्य फलंदाज होते. तर विजय शंकर, केदार जाधव आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू होते. तसेच रिषभ पंत हा नवोदित खेळाडू होता. त्यामुळे फलंदाजांचा अनुभव हा फक्त वरच्या फळीकडे अधिक होता.

या सामन्यानंतर भारताच्या या 11 जणांच्या संघाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘ संघाचे मिश्रण सुसंगत आहे. यात फक्त परिस्थितीनुसार एक बदल होऊ शकतो. जेव्हा हार्दिक पंड्या पुनरागमन करेल तेव्हा फलंदाजीमध्ये खोली येईल आणि गोलंदाजीसाठीही एक पर्याय मिळेल. आम्हाला माहित आहे आम्ही कुठे चाललो आहोत. आम्ही आमच्या अंतिम 11 जणांच्या संघाबाबत स्पष्ट आहोत.’

महत्त्वाच्या बातम्या-

तो महान खेळाडू म्हणतो, विराट वनडेतील सर्वात महान खेळाडू ठरणार

कॅप्टन कूल धोनी विरुद्ध किंग कोहली सज्ज

जाणून घ्या १४२ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास