होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी

दिल्ली | आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली रणजी ट्राॅफीतील सामन्यात आज दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. गंभीरने काही दिवसांपूर्वीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यामुळे त्याचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे.

यावेळी गंभीरने 185 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 112 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार ध्रुव शोरे आणि हितेन दलाल यांनी उत्तम फलंदाजी करत गंभीरला चांगली साथ दिली. दुसऱ्या दिवशी या सामन्यात आंध्रप्रदेशचा पहिला डाव 390 धावांवर संपुष्टात आल्यावर दिल्लीकडून सलामीला आलेला गंभीर आणि  दलाल यांच्या जोडीने 108 धावांची जोरदार सलामी दिली.

पण दलाल 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर गंभीरला 112 धावांवर शोएब खानने बाद केले.

सध्या लंच ब्रेकनंतर शोरे नाबाद 90 आणि वैभव रावल नाबाद 29 धावांवर खेळत आहेत. ते अजुनही 95 धावांनी पिछाडीवर आहेत.

शेवटचा सामना खेळत असलेल्या गंभीरला आंध्र प्रदेशच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला.

1999-2000हंगामात गंभीरने आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. तो आपला शेवटचा सामना खेळत आहे.

गंभीरने आत्तापर्यंत भारताकडून 58 कसोटी सामने, 147 वनडे सामने आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 242 सामने खेळताना 38. 45 च्या सरासरीने 10324 धावा केल्या आहेत. यात त्याने 20 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅडलेड कसोटी दरम्यान पृथ्वी शॉने दिली फिटनेस टेस्ट

यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी

Video: जेव्हा कर्णधार कोहली मैदानातच दाखवतो नृत्यकला…