म्हणून गौतम गंभीर हा इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे !

भारताचा सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरचे देशप्रेम सर्वांनाच माहित आहे. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला गंभीर देशप्रेमाची अनेक गोष्टी करतो.

वेळोवेळी समाजासाठी काही ना काही चांगलं काम करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही महिन्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च गंभीरने उचलला होता. त्यांनतर काही दिवसांनी गंभीरने गरिबांना वर्षभर मोफत जेवण मिळावं यासाठी दिल्लीमधील पटेल नगर येथे आपल्या संस्थेमार्फत कार्यक्रम सुरु केला.

सध्या गंभीरने ट्विटरवर पुन्हा एकदा अशीच पोस्ट करून काश्मीरमध्ये शाहिद झालेल्या पोलीसाच्या मुलीचा आयुष्यभराचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. गंभीरने अतिशय भावनिक असे तीन ट्विट केले आहे. झोहरा असे त्या हुतात्मा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे नाव आहे.

गंभीर म्हणतो, ” झोहरा मी तुझ्यासाठी अंगाई गीत गाऊ शकत नाही परंतु मी तुला यातून उभे राहण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करेल. मी तुझ्या वडिलांना सलाम करतो. झोहरा तू मला माझ्या मुलीसारखी आहे. माझे त्यासाठी आभार मानू नकोस. मी ऐकलं आहे की तुला डॉक्टर बनायचं आहे. तुझे पंख फडकव आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झेप घे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. “