गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला शनिवारी (20 जूलै) सुरुवात झाली आहे. या मोसमात यूपी योद्धा संघाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरला आज(24 जूलै) संघाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित केले आहे. आज यूपी योद्धाचा या मोसमातील पहिला सामना आहे. आज ते बंगाल वॉरियर्स विरुद्ध खेळत आहेत.

गंभीर याबद्दल यूपी योद्धाने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच या ट्विटमध्ये म्हटले आहे की सर्व उत्तर प्रदेशची आण, बाण आणि शान, भारताचा चहिता(आवडता) गौतम गंभीर आणि यूपी योद्धा घेऊन येत आहे तूफान.’

याबरोबरच गौतम गंभीरनेही ट्विट करत म्हटले आहे की ‘यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसिडर झाल्याबद्दल अभिमान वाटतो.’

गंभीरने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारतीय संघाने विजेतेपद मिळवलेल्या 2007 टी20 विश्वचषकात आणि 2011 वनडे विश्वचषकात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 242 सामने खेळताना 38.95 च्या सरासरीने 10324 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला असून तो सध्या पूर्व दिल्लीचा खासदार आहे. यानंतर आता त्याने यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून कबड्डीमध्येही प्रवेश केला आहे.

यूपी योद्धाने प्रो कबड्डीमध्ये 5 व्या मोसमात पदार्पण केले होते. त्यांना प्रोकबड्डीच्या त्यांनी खेळलेल्या दोन्ही मोसमात बाद फेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे. पण मात्र त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात अपयश आले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

१० दिवसांपूर्वी ज्या मैदानावर मिळवले विश्वविजेतेपद त्याच मैदानावर इंग्लंडची आज झाली अशी अवस्था

…म्हणून विराट कोहलीने घेतली नाही विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती

एका इन्स्टाग्राम पोस्टचे विराट कोहलीला मिळतात एवढे कोटी, ऐकून व्हाल थक्क!