गौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू

२६ एप्रिलला छत्तीसगढमध्ये झालेल्या सुकमा माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले. गौतम गंभीरने आपल्या ट्वीटरवर लिहीत म्हणाला, अश्या बातम्या वाचाव्या लागणं हे अतिशय दु: खद आहे.

या बरोबरच नुसतं बोलूनच नाही तर कृती करून करून गंभीर म्हणाला या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च गौतम गंभीर फाऊंडेशन करेल. आणि त्याची तयारी देखील सुरु झाली आहे असेही तो म्हणाला. २६ तारखेला झालेल्या पुणे वि. कोलकाता सामन्यात कोलकाता संघाने काळी फीत लावून या गोष्टीची निंदा केली. अश्या घटना घडल्यावर सामना खेळणं अवघड आहे. एकूणच गंभीरची हळवी बाजू आपल्या समोर आली आणि आपले देशावर किती प्रेम आणि गर्व आहे हे त्याने त्याच्या कृतीतून दाखवून दिले.