गौतम गंभीरची ही हळवी बाजू आपल्याला ठाऊक आहे का ?

क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक खेळीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा भाारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम गंभीर मैदानाबाहेर ही खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या वेळोवेळी समाजासाठी काही ना काही चांगलं काम करण्याच्या गुणामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय असतो.

काही महिन्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च गंभीरने उचलला होता. सध्या गंभीर आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरीसुद्धा तो सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. गंभीरने गरिबांना वर्षभर मोफत जेवण मिळावं यासाठी दिल्लीमधील पटेल नगर येथे आपल्या संस्थेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमअंतर्गत वर्षभर गरिबांना मोफत जेवण मिळणार आहे.

कुठल्याही गरिबाला उपाशी पोटी झोपावं लागू नये यासाठी गौतम गंभीरने हे काम हाती घेतलय. गंभीरने सोशल मीडियाद्वारे आपल्या या समाजकार्याची माहिती दिली.गंभीरच्या या समाजकार्याचे अनेक स्थरातून कौतुक होत आहे. प्रत्येक माणसाने जर गौतम गंभीर सारखा विचार केल्यास समाजातील गरिबांना आधार मिळेल हे मात्र नक्की.

– सचिन आमुणेकर (टीम महा स्पोर्ट्स)