अंबाती रायडू संघात असता तर भारत वनडे मालिका जिंकला असता, माजी खेळाडूचे संघ निवडीवर ताशेरे

२०१८ च्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करुनही यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूला इंग्लड विरुद्धच्या टी-२० अणि एकदिवसीय मालिकेतून वगळले होते.

या गोष्टीला जवळपास दोन महिने झाल्यानंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने यावर आपले मौन सोडत संघ व्यवस्थापनावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

“एखाद्या खेळाडूला संघातून वगळण्यापूर्वी त्याची कामगिरी प्रथम पहावी आणि बाकीच्या गोष्टी नंतर. रायुडूने आपीएलमध्ये ज्या पद्दतीचे प्रदर्शन केले ते पहाता, तो इंग्लंडमध्ये भारतीय संघात हवा होता. जर तो संघात असता तर भारताची मधल्या फळीतील फलंदाजी भक्कम झाली असती. कदाचित भारत एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकलाही असता.” असे म्हणत गंभीरने संघ व्यवस्थापनावर निशाना साधला.

“जर एखादा खेळाडूने यो-यो टेस्टमध्ये पास होण्यासाठी लागणारे गुण काठावर मिळवले तर त्याला पुढे नेण्याचे काम ट्रेनरचे आहे. खेळाडू फिटनेसमध्ये कमी पडत असतील तर त्यांच्यात प्रगती घडवून आणण्याची जबाबदारी ट्रेनरने पार पाडणे आवश्यक आहे.” असे गौतम गंभीर म्हणाला.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची फिटनेस चांगली रहावी यासाठी बीसीसीआयने गेल्या एक ते दिड वर्षापासून यो-यो टेस्टचा अवलंब केला आहे.

या वादग्रस्त यो-यो टेस्टवर गौतम गंभीरप्रमाणे अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!

-लॉर्ड्स कसोटी- पहिल्या दिवसाचा खेळ न होउनही टीम इंडिया खूष