त्या मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी गेलची भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतून माघार

भारत दौऱ्यावर आलेल्या विंडिजचा संघ खुपच कमी अनूभवी आहे. त्यामुऴे मजबुत भारतीय संघासमोर त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यातच या संघाचा अनुभवी आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलने वन-डे मालिकेतूनही माघार घेतली आहे.

गेल युएईत होणाऱ्या अफगाणिस्तान प्रिमियर लीगमध्ये बाल्ख लिजन्ड्स या संघाकडून खेळणार आहे. विंडिज क्रिकेट मंडळाकडून त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

विंडिज मंडळाकडून त्याला 7 ते 21 ऑक्टोबर दरम्यानचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. भारताविरुद्धची वन-डे मालिका 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला होणार आहे.

त्यानंतर टी-20 मालिकेला 4 नोव्हेंबरपासून कोलकत्ता येथे सुरू होणार आहे. टी-20 मालिकेसाठी गेल उपलब्ध आहे होणार की नाही याबद्दल देखील अजून साशंकता आहे.

विंडिजचा भारताविरूद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठीचा संघ अजून घोषीत करण्यात आलेला नाही. त्यात ख्रिस गेलचा समावेश होण्याची शक्यता कमीच आहे.

2019 विश्वचषक स्पर्धेत गेलचे खेळणे निश्चत नाही आणि या स्पर्धेत त्याची निवड आपोआप होऊ शकत नाही. त्याला आधी इंग्लड दौऱ्यावर खेळावे लागेल, असे सुत्रांकडून समजले आहे.

गेलने त्याच्या ट्विटर अकांउटवरून सांगितले की ‘मी सारजाह येथे एपीएल  स्पर्धेत बाल्ख लिजन्ड्सकडून खेळण्यासाठी आलो आहे’. त्याने या संघाला पाठिंबा देण्याचे आव्हान त्याने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-