- Advertisement -

ख्रिस गेलला विंडीजच्या एकदिवसीय संघात संधी

0 55

स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना १५ सदस्यीय विंडीजच्या संघात स्थान देण्यात आले आहे. हा संघ इंग्लंड विरुद्ध ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

२१ मार्च २०१५ अर्थात तब्बल २ वर्षांपूर्वी गेल विंडीजकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. मार्लन सॅम्युएलही ऑक्टोबर २०१६ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना विंडीजकडून खेळले आहेत.

जर गेल या मालिकेत कोणताही सामना खेळला तर विंडीजकडून सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम गेलच्या नावावर होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी विंडीजचा संघ:
सुनील अम्बरीस, देवेंद्र बिशू, मिन्गुइल कमिन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर(कर्णधार), कायले होप, शाई होप, अलझाररी जोसेफ, एवीन लेविस, जेसन मोहम्मद(उपकर्णधार), ऍशली नर्स, रोवमान पॉवेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर, केसरीक विल्यम्स

Comments
Loading...
%d bloggers like this: