राष्ट्रकुल स्पर्धा २०१८- भारताला दुसरे सुवर्ण, संजिता चानूचा वेटलिफ्टिंगमध्ये भीमपराक्रम

गोल्ड कोस्ट | वेटलिफ्टर मिराबाई चानूच्या कालच्या सुवर्ण पदकापाठोपाठ आज दुसऱ्या दिवशीही भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या संजिता चानूने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

५३ किलो वजनी गटात तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.या वजनी गटात तिने १९२ किलो वजन उचलत ही कामगिरी केली. २०१४ साली ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते.

स्नच प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात ८१, दुसऱ्या प्रयत्नात ८३ तर तिसऱ्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विश्वविक्रम केला आहे.

क्लिन आणि जर्क प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात १०४, दुसऱ्या प्रयत्नात १०८ तर तिसऱ्या प्रयत्नात ११२ किलो वजन उचलले.

यामुळे तिने एकूण १९२ किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. पीएनजीची लोआ डिका १८२ किलो वजन उचलच रौप्य पदकाची विजेती ठरली आहे.

यामुळे तिन पदकासह भारत पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी आला आहे.