राज्य कबड्डी असोशिएशनच्या सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्ती समिती गठीत होणार

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची सर्वसाधारण सभा शुक्र. दि.१५जून २०१८ रोजी सकाळी ११-००वा. राज्य संघटनेच्या कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत दि.२७मे २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीबाबत चर्चा, घटना दुरुस्ती करिता घटना समिती गठीत करणे, “१५जुलै २०१८ – राज्य कबड्डी दिन” आयोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे आदी विषय चर्चिले जाऊन ठोस निर्णय घेतले जातील.
याबाबतचे परिपत्रक संलग्न जिल्हा संघटना, जिल्हा कबड्डी असो.चे ३ नामनिर्देशित प्रतिनिधी, आजीव सभासद यांना रवाना करण्यात आली आहेत. ज्या कोणाला हे परिपत्रक काही कारणास्तव मिळाले नसल्यास त्यांनी हे पत्र समजून या सभेस वेळेवर उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घ्यावा असे आव्हान या पत्राद्वारे संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी केले आहे.