मायकेल वॉन नंतर आणखी एका दिग्गजाने साधला आदिल रशिदवर निशाना

भारता विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात फिरकी गोलंदाज आदिल रशिदची आश्चर्यकारकपणे निवड झाली आहे.

आदिल रशिदच्या या निवडीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यामध्ये आता इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक जेफ्री बॉयकॉट यांची भर पडली आहे.

एका वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात  जेफ्री बॉयकॉट यांनी आदिल रशिदच्या निवडीवर जोरदार टीका केली आहे.

“इंग्लंडच्या निवड समितीने अशा खेळाडूची निवड केली आहे, जो खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी मनापासून तयार नाही. जो क्रिकेटपटू कौंटीमध्ये चार दिवसीय सामने खेळण्याचे टाळतो त्याची इंग्लंडच्या कसोटी संघात निवड होणे हस्यास्पद आहे.” असे जेफ्री बॉयकॉट म्हणाले.

तसेच या स्तंभात आदिल रशिदने मायकेल वॉनवर केलेल्या टिकेबद्दल बॉयकॉट यांनी त्याचा जोरदार समाचार घेतला.

“मायकेल वॉनला इंग्लिश क्रिकेट चाहते सर्वोत्तम कर्णधार आणि फंलदाज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. मात्र दहा वर्षानंतर आदिल रशिदला त्याच्या कसोटी कामगिरी साठी कोणीही लक्षात ठेवणार नाही.” असे बॉयकॉट म्हणाले.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी

मांजरेकर आज विराटला सल्ला देतायं, उद्या फेडररला देतील