HWL 2017: उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी आज जर्मनी भिडणार नेदरलँड्स सोबत

हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये जर्मनीचा आजचा सामना नेदरलँड्स विरुद्ध आहे. जर्मनी आणि नेदरलँड्समधील आजचा सामना उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी असेल.

या स्पर्धेतील साखळी सामन्यात जर्मनी संघ ३ सामने खेळला असून जर्मनचा पहिला सामना इंग्लड विरुद्ध होता. या सामना जर्मनी ने २-० अश्या फरकाने जिंकला.

दुसरा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होता हा सामना २ -२ अश्या फरकाने सोडवला. तर तिसरा सामना भारताबरोबर होता. हा सामना २-० अश्या फरकाने जिंकला.

या स्पर्धेतील साखळी सामन्यात नेदरलँड्स संघ ३ सामने खेळला. संघाचा पहिला सामना स्पेन विरुद्ध होता. नेदरलँड्स हा सामना २-३ अश्या फरकाने हरला.

दुसरा सामना अर्जेंटीना संघाबरोबर होता. हा सामना ३-३ अश्या बरोबरीने सोडविला. तर तिसरा सामना बेलजियम संघाबरोबर होता. हा सामना नेदरलँड्स ०-३ अश्या फरकाने हरला.

जागतिक क्रमांकात जर्मनी ५ व्या क्रमांकावर असून नेदरलँड्स ४ थ्या क्रमांकावर आहे.