घाटकोपर कबड्डी प्रीमियरल लीग चे दणक्यात उदघाटन !!

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व दुसरे उदघाटन सोहळा काल रविवार दि ६ जाने २०१९ रोजी कबड्डीच्या पंढरी भटवाडीत मोठया उत्साहात पार पडला. संस्थेतर्फे विभागातील जागृत देवस्थान श्री सिद्धी गणेशाच्या आशिर्वादाने सहभागी सर्व खेळाडू, संघमालक,प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना मराठमोळी परंपरा जपत फेटे बांधून ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या सन्मानाने शोभा यात्रा कै. दत्ताजी साळवी क्रीडांगना पर्यन्त काढण्यात आली त्यास विभागातील सर्व क्रीडारसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या उद्घाटन सोहळ्यास एखाद्या राष्ट्रीय कबड्डी आयोजनाचे स्वरूप आले होते. कै दत्ताजी साळवी क्रीडांगणात उभारलेले भव्य दिव्य आकर्षक क्रीडानगरीत प्रत्येक संघ शिस्तबद्ध पद्धतीने आकर्षक प्रकाशयोजनेच्या आणि संगीत तालावर प्रवेश करत होता. मुंबई उपनगरातील ८२ संघाचे १२० खेळाडू १० संघामध्ये विभागून हि लीग स्पर्धेचे आयोजन आहे.

उद्धघाटन प्रसंंगी नेते सन्मानीय श्री बाळा नांदगावकर, मनसे विभागअध्यक्ष श्री गणेश चुक्कल , राष्ट्रीय खेळाडू श्री सागर बांदेकर , संस्थेचे अध्यक्ष मनसे उपविभाग अध्यक्ष श्री निलेश जंगम, सरचिटणीस अखिल भारतीय विमा सेना श्री रवींद्र घाग, तसेच कबड्डीतील दिग्गज खेळाडू उपस्थित होते, नजरेचे पारणे फेडणारा हा उदघाटन सोहळा सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.

उदघाट्नचा गटातील सामना गत वर्षीचा विजयी संघ भटवाडी साई दर्शन व आर्यन वॅरियर्स या संघांमध्ये खेळवला गेला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ केला. सर्व क्रीडा रसिकांनी खेळाडूंच्या खेळाला भरभरून दाद दिली. सामना अत्यंत चुरशीचा झाला कधी आर्यन चे पारडे जड तर कधी भटवाडी साई दर्शनचे , सामन्यात भटवाडी साईदर्शन २३ गुण यांनी आर्यन वॅरियर्स २० गुण अश्या ३ गुणांचा फरकाने गटातील पहिला सामना जिंकला.

भटवाडी साई दर्शनाच्या ओंकार सकपाळ यांनी चढाईत व मनीष लाड यांनी मध्य रक्षक म्हणून चांगली कामगिरी केली पराभूत संघाकडून आदेश सावंत व सिद्धेश पांचाळ यांनी आक्रमक चढाई करीत पराभव टाळण्याचे शर्तीचे प्रयत्न केले , दुसऱ्या सामन्यात दिल्ली योध्याने २८ विरुध्य राजे चंद्रराव वॅरियर्स २५ अश्या गुणांनानि ३ सामना जिंकला विजयी संघात मनीष साने यांनी अष्टपैलु खेळ केला व पराभूत संघाकडून सुयोग राजापकर एकाकी लढला .

सर्व सामने चुरशीचे होतील अशी खात्री लीग नियोजन समिती सदस्य श्री मोहन पडावे , प्रविण गावडे , मिलिंद कदम यांनी दिली आहे . पुढील ७ दिवसात लीग ला अनेक राष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती लाभणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देवगडमध्ये रंगणार राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धांचा थरार

आजपासून घाटकोपरमध्ये कबड्डीचा महाकुंभ, घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग…