घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग, जाणुन घ्या तिसऱ्या दिवसाचे निकाल

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग पर्व दुसरेचा तिसऱ्या दिवशी कै दत्ताजी साळवी क्रीडांगण, भटवाडी, घाटकोपर येथे रॉयल पंतनगर विरुद्ध आई शिंब्रादेवी वॉरिअर्स यांच्यात झालेल्या पहिल्या लढतीत आई शिंब्रादेवी वॉरिअर्सने २५-२१ असा विजय मिळवला. अशोक चौहान व अक्षय शेवडे यांनी विजयात प्रमुख भूमिका निभावली.

तर देवांश सुपर किंग विरुद्ध आर्यन वॉरिअर्स यांच्यातील झालेला सामना ३०-३० असा बरोबरीत झाला. ५-५ चढाईत हा सामना देवांश सुपर किंगने जिंकला. देवांशकडून सचिन पानमंद व नितेश शिंदे यांनी चांगला खेळ केला.

घाटकोपरची आई महाकाली विरुद्ध राजे चंद्रराव वॉरिअर्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात राजे चंद्रराव वॉरिअर्स संघाने २५-२३ अशी बाजी मारली. राजे चंद्रराव कडून कपिल नलावडेने चांगला खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.

अनिश्री चॅलेंजर्स विरुद्ध रणपिसे रॉयल हा सामना सुध्या २०-२० गुणांवर संपला. ५-५ चढाईत हा सामना अनिश्री चॅलेंजर्सने हा सामना जिंकला. भटवाडी साई दर्शन पॅकर्स विरुद्ध दिल्ली योद्धा यांच्यात अटीतटीची लढत झाली. दिल्ली योद्धाने २०-१९ असा विजय मिळवला. दिल्ली योद्धाच्या सूरज मोरे ने चढाईत चतुरस्त्र खेळ केला. तिसऱ्या दिवसांतील शेवटच्या सामन्यात रॉयल पंतनगरने देवांश सुपर किंगचा २४-२१ असा पराभव केला.

तिसऱ्या दिवसातील सामन्यांचे निकाल

१) रॉयल पंतनगर २१ विरुद्धआई शिंब्रादेवी वॉरिअर्स २५
उत्कृष्ट खेळाडू – अशोक चौहान (आई शिंब्रादेवी वॉरिअर्स)

२) देवांश सुपर किंग ३० विरुद्ध आर्यन वॉरिअर्स ३०
५-५ चढायांमध्ये देवांश सुपर किंग विजयी
उत्कृष्ट खेळाडू – सचिन पानमंद (देवांश सुपर किंग)

३) घाटकोपरची आई महाकाली २३ विरुद्ध विरुद्ध राजे चंद्रराव वॉरिअर्स २५
उत्कृष्ट खेळाडू – दीपेश रामाणे (घाटकोपरची आई महाकाली)

४) अनिश्री चॅलेंजर्स २० विरुद्ध रणपिसे रॉयल २०
५-५ चढायांमध्ये हा सामना अनिश्री चॅलेंजर्स विजयी
उत्कृष्ट खेळाडू – मयूर जाधव (रणपिसे रॉयल)

५) भटवाडी साई दर्शन पॅकर्स १९ विरुद्ध दिल्ली योद्धा २०

उत्कृष्ट खेळाडू – सुरज मोरे (दिल्ली योद्धा)

६) देवांश सुपर किंग २१ विरुद्ध रॉयल पंतनगर २४
उत्कृष्ट खेळाडू – ओमकार कदम (रॉयल पंतनगर)

महत्त्वाच्या बातम्या –

पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?

कॉफी विथ करन हार्दिक पंड्या, केएल राहुलला पडले महागात…

उदयोन्मुख खेळाडूंसाठी खेलो इंडिया स्पर्धा ही सुवर्णसंधी