घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग: जाणुन घ्या, चौथ्या दिवसाचे निकाल…

घाटकोपर प्रतिष्टान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग पर्व दुसरे चा चौथ्या दिवशी कै दत्ताजी साळवी क्रीडांगण, भटवाडी, येथे आई शिंब्रादेवी वॉरिअर्स विरुद्ध राजे चंद्रराव वॉरिअर्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजे चंद्रराव संघाने २१-१८ विजय मिळवला, सुयोग राजपकरने चढाईत ११ गुणांची कमाई केली.

दुसरा सामना घाटकोपरची आई महाकाली विरुद्ध दिल्ली योद्धा यांच्यात झाला. अंत्यत अटीतटिच्या या सामन्यात दिल्ली योद्धाने २४-२२ असा विजय मिळवला. दिल्ली योद्धाकडून मनीष सानेने ९ गुणाची कमाई केली.

अनिश्री चॅलेंजर्सने आई शिंब्रादेवी वॉरिअर्सला २१-१५ असे पराभूत केले. अनिश्री चॅलेंजर्सकडून विघ्नेश चौधरी व समाधान घाग यांनी ५-५ गुण मिळवले. भटवाडी साई दर्शन पॅकर्स विरुद्ध रॉयल पंतनगर हा सामना २५-२५ असा समान गुणांवर संपला. ५-५ चढाईत भटवाडी साई दर्शनाने २ गुणांनी बाजी मारली.

चौथ्या दिवसाचे संक्षिप्त निकाल:

१) आई शिंब्रादेवी वॉरिअर्स १८ विरुद्ध राजे चन्द्ररा २१

२) घाटकोपरची आई महाकाली २२ विरुद्ध दिल्ली योद्धा २४

3) अनिश्री चॅलेंजर्स २१ विरुद्ध आई शिंब्रादेवी वॉरिअर्स १५

४) देवांश सुपरकिंग१६ विरुद्ध घाटकोपरची आई महाकाली २१

५) भटवाडी साई दर्शन पॅकर्स २५ विरुद्ध रॉयल पंतनगर २५

५-५ चढायांमध्ये हा सामना भटवाडी साई दर्शन पॅकर्स ने हा सामना २ गुणांनी जिंकला

महत्त्वाच्या बातम्या –

आजपासुन विक्रोळीत राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धाचा थरार…

राज्यस्तरीय कुमार गट “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल