आजपासून घाटकोपरमध्ये कबड्डीचा महाकुंभ, घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग…

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व दुसरे चे आयोजन कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या भटवाडी घाटकोपरमध्ये दिनांक ६ जाने ते १३ जाने २०१९ या कालावधीत कै. दत्ताजी साळवी क्रीडांगणात आयोजित करण्यात आले आहे.

घाटकोपर प्रतिष्ठानने ३ सराव शिबिराचे आयोजन करून मुंबई पूर्व उपनगरातील ८२ अधिकृत संघातील ७५० खेळाडू तुन १२० दर्जेदार खेळाडूंची बोली पद्धतीने १० संघात दोन गटात विभागणी केली आहे. १० संघांतील खेळाडूंचा गेले २० दिवस उपनगरातील मान्यवर प्रशिक्षकांच्या मागर्दशनात कसून सराव होत आहे.

प्रथम श्रेणी पुरुष गट, द्वितीय श्रेणी पुरुष गट व कुमार गटाच्या खेळाडूंचे योग्य ते मिश्रण करून लीग गट व बाद पद्धतीने खेळावली जाईल.

प्रो कबड्डीचे प्रतिबिंब असलेल्या या स्पर्धेचा नयनरम्य उदघाटन सोहळा आज रविवार दि ६ रोजी २०१९ होणार आहे. तदप्रसंगी सन्मानीय प्राचार्य श्री राजेश सुभेदार सर , प्राचार्य श्री भालचंद्र दळवी सर, प्राचार्य श्री बाळासाहेब म्हात्रे सर, श्री चंद्रकांतजी मालकर,श्री गणेशजी चुक्कल उपस्थित राहणार आहेत .संपूर्ण लीगचे थेट प्रेक्षपन यु ट्यूब, ह्यात्वे, इन केबल नेटवर्क, सेवन स्टार, डेन या केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून होणार आहे.

लीगकरिता विभागीय सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री अतुल खुळे यांच्या कल्पनेतून भव्य व आकर्षक व्यासपीठ, ३००० क्रीडा रसिक लीगचा आनंद घेऊ शकतील अशी आसन व्यवस्था असलेली भव्य क्रीडांनगरी साकार होत आहे. लीग यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश जंगम व कार्याध्यक्ष श्री हेमंत तोडणकर यानाच्या नेतृत्वाखाली घाटकोपर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारणी सभासद व विभागीय संस्थेचे खेळाडू दिवस रात्र झटत आहेत.

स्पर्धेचे आयोजक: मुंबई उपनगर कबड्डी असो. मान्यतेने घाटकोपर प्रतिष्ठान ने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीगचा आयोजन केले आहे.

स्पर्धेचा कालावधी: घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व २ रे दिनांक ६ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत होणार आहे.

स्पर्धेचा ठिकाण: कै.दत्ताजी साळवी क्रीडांगणा, भटवाडी, बर्वेनगर, घाटकोपर (प.) ८४

स्पर्धेतील सहभागी संघ: घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग मध्ये यंदा १० संघांनी संघभाग घेतला असून त्याची दोन गटात विभागणी केली आहे.

अ गट – देवांश सुपर किंग, भटवाडी साईदर्शन पॅकर्स, रॉयल पंतनगर, भटवाडीचा आई महाकाली , दिल्ली योद्धा.

ब गट – अनिश्री चॅलेंजर्स, आर्यन वारीयर्स, रणपिसे रॉयल, शिंब्रादेवी वारीयर्स, राजे चंद्रराव वारीयर्स.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रीडाविश्वाचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या पुण्यातील खेलो इंडिया गेम्सची अशी असणार रूपरेषा

३३ वर्षांनंतर थायलंडवर विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक