वो घुमने वाला डाल! धोनीचे स्टंप पाठीमागचे संभाषण कॅमेऱ्यात कैद !

चेन्नई । जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीचं नाव का घेतलं जात याची अनेक उदाहरणं आहेत. त्याच्या अपारंपारीक आणि वेगळ्या यष्टिरक्षणच्या शैलीमुळे त्याने जगातील अनेक फलंदाजांचे अवघड केले आहे.

धोनी स्टंपपाठीमागून सतत गोलंदाजांना काही ना काही सांगत असतो. धोनीचे हे यष्टीपाठीमागचे विडिओ एकत्र केले तर त्याच नवीन कर्णधार, गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यासाठी विद्यापीठ होईल.

अशा या खेळाडूचे चेन्नई शहराशी नाते काही खास आहे. येथे खेळताना एक कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्याचा खेळ कायमच बहरत असतो. अशीच एक खास गोष्ट ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात आली. धोनी आणि पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने एक सन्मानजनक धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.

परंतु जेव्हा संघ क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा एमएस धोनी स्टंपपाठीमागून एक अदृश्य कर्णधाराप्रमाणे एक मोठं काम करत होता. भारतीय संघात सध्या नवीन असलेल्या युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव या गोलंदाजांना धोनी सतत काहीतरी सांगत होता. डेविड वॉर्नर या सामन्यात चांगली फलंदाजी करत होता तेव्हा धोनीने कुलदीपला स्टंप पाठीमागून मार्गदर्शन केले आणि त्यात डेव्हिड वॉर्नर बाद झाला याचा खुलासा कुलदीप यादवने केला आहे.

स्टंपमधील माइकने धोनीचे हे सर्व संभाषण रेकॉर्ड होत होते त्यात धोनीची काही वाक्य अशी होती.

वो मारने वाला डाल ना! अंदर या बाहर कोई भी!

घुमने वाला डाल घुमने वाला!

जेव्हा कुलदीप यादवला मॅक्सवेलने ३ षटकार आणि १ चौकार खेचला तेव्हा धोनी म्हणाला:
स्टंप पे मत डाल ! अरे बाहर डाल, इसको इतना आगे नही !

जेव्हा युझवेन्द्र चहल देखील कुलदीप यादवसारखी चूक करू लागला तेव्हा धोनी म्हणाला:

तू भी नही सुनाता हैं क्या? ऐसे ऐसे डालो !

यापूर्वी विंडीज दौऱयावर असतानाही धोनीचे संभाषण स्टंपवरील कॅमेऱ्यात स्पष्ट ऐकू आले.

त्यात धोनी अश्विनला म्हणत असतो., ” बॉल देखो, ऍश. कहाँ ध्यान हैं?

त्याच सामन्यात त्याने डीआरएस वाया जाऊ नये म्हणून कोहलीला सल्ला दिला:
लेग स्टंप के बाहर जा रहा हैं रिव्हिव्ह खराब हो जायेगा और कूछ नही!

धोनीच्या याच खास वैशिष्ट्यांमुळे त्याने खेळाला आणि यष्टिरक्षणाला एका खास उंचीवर नेवून ठेवले आहे.