मारुती सुझुकी दक्षिण डेअर: गिलकडे आघाडी तर, संदीप तिस-या स्थानी

देवांगेरे: संदीप शर्माने आपला फॉर्म कायम ठेवत मारुती सुझुकी दक्षिण डेअरच्या चौथ्या दिवसअखेर तिस-या स्थानावर झेप घेतली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्स चालक असलेल्या त्याने नेव्हिगेटर अनमोल रामपालसह 05:18:19 अशी वेळ नोंदवली.
सुरुवातीच्या दिवशी मला चमक दाखवता आली नाही पण, नंतर मला सूर सापडला. मी चांगली वेळ नोंदवली आणि यामध्ये सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे याचा शेवट काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल असे शर्मा म्हणाले.महिंद्र रेसर गौरव गिलने लीडरबोर्डमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आहे.
गिल (मुसा शेरीफसह) याने चार विशेष स्तरामध्ये चमक दाखवत 04:59:45 वेळेसह चमक दाखवली. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्तीसह) याने 05:07:15 वेळेसह दुसरे स्थान मिळवले. मथाई व गिल यामध्ये आठ मिनिटांचा फरक आहे.
अमित्रजित घोष व त्याचा सह चालक अश्‍विन नाईक यांना सलग तिस-या दिवशी म्हणावी तशी कामगिरी न करता आल्याने चौथ्या स्थानी रहावे लागले. त्याने 5:19:06 अशी वेळ नोंदवली.
मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्सच्या सम्राट कुमार (करण उकटासह) याने 5:19:29 सेकंद वेळेसह पाचवे स्थान मिळवले.बाईक गतात युवा कुमार व आकाश ऐतल हे अनुक्रमे पहिल्या व दुस-या स्थानी आहे. तर, तिस-या फेरीनंतर जतिन जैन तिस-या स्थानी होता.

 

महत्त्वाच्या बातम्या:

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

Video: यष्टीरक्षक इशान किशनची एमएस धोनी स्टाईल किपिंग

रोहित शर्माने विराट कोहलीला केले सोशल मिडियावर अनफॉलो; चाहत्यांची वाढली चिंता