रॅली ऑफ अरुणाचलच्या पहिल्या दिवशी गिलला पराभवाच धक्का, तरीही आघाडी कायम 

इटानगर: तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलला एमआरएफ एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली अजिंक्यपद स्पर्धेच्या तिस-या फेरीतील रॅली ऑफ अरुणाचलच्या पहिल्या दिवशी टायर पंक्‍चर झाल्याने हंगामातील पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले.
टिम महिंद्राचा गिल मुसा शेरीफसह सहभागी झाला होता. या दोघांनीही मिळून अनेक स्पर्धेंमध्ये चमक दाखवली. त्याच्या रेसची गती ही 110 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.तर, सुरुवातीच्या फेरीत कधीकधी ही गती 115.55 किमी प्रति तास अशी होती. दुस-या फेरीत त्याची सरासरी गती 99.92 किमी प्रति तास अशी होती.
गिलचा महिंद्राचा संघसहकारी अमित्रजित घोष ( अश्‍विन नाईकसह)  त्याने गिलला मागे टाकत दुस-या फेरीत चमक दाखवली. त्याला पहिल्या फेरीत अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने नवव्या स्थानी रहावे लागले होते. त्याने इतर फे-यांमध्ये चमक दाखवत चांगली आघाडी घेतली.
स्नॅप रेसिंगच्या फाल्गुना उसर्ने (श्रीकांत) एक सेकंद व दोन तृतीयांशसह रेस संपवल्याने दुसरे स्थान मिळवले.चौथ्या व अंतिम फेरीत त्यांची पाचव्या स्थानी घसरण झाली. गिले व शेफीफच्या 01:31.8 सेकंद पिछाडीवर आहे. त्यांना आयएनआरसी 2 गटात अव्वल स्थानी राहण्यात यश मिळाले. त्यांच्यापुढे राहुल कांथराज (विवेक भट) आणि कर्ण कदूर (पीव्हीएस मुर्थी) हे आहेत.
आयएनआरसी 3 गटात सुहेम कबीर (जीवराथिनम) यांनी आघाडी घेतली आहे. अरुर विक्रम राव (सोमय्या एजी) यांना चौथ्या फेरीत मागे टाकत त्यांनी आघाडी घेतली. सुहेमने चांगली कामगिरी करत चमक दाखवली आहे.
निकाल :
आयएनआरसी : 
1) गौरव गिल/ मुसा शेरीफ (टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर, 00:31:22.9) 2) अमित्रजित घोष / अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर, 00:33:05.1) 3) लोकेश गोवडा/ वेनु रमेश कुमार (टीम चॅम्पियन्स 00:37:30.4)
आयएनआरसी 2 : 
1) फाल्गुना उर्स/ श्रीकांत (स्नॅप रेसिंग 00:32:54.7) 2) राहुल कांथराज/ विवेक वाय भट ( आर्का मोटरस्पोर्ट्स 00:33:20.9) 3) कर्ण कदूर / पीव्हीएस मुर्थी ( आर्का मोटरस्पोर्ट्स 00:33:52.7)
आयएनआरसी 3 :
1) सुहेम कबीर/ जीवराथिनम (टीम चॅम्पियन्स 00:33:17.8) 2) डीन मॅस्के-हेनस / श्रुप्था पाडीवाल (टीम चॅम्पियन्स 00:33:23.2) 3) अरुर विक्रम राव/ सोमय्या (फाल्कन मोटर स्पोर्ट्स 00:25:20.5)
एफएमएससीआय 2 डब्ल्युडी कप
1) आदिथ केसी/ अर्जुन एसएसबी ( आदिथ केसी 00:34:18.6) 2) रक्षिथ अय्यर/ सागर मालप्पा ( रक्षित अय्यर 00:08:39.7)