जेव्हा बाॅलीवूडचा महान अभिनेता सुनील शेट्टी देतो रिषभ पंतला जोरदार पाठींबा

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 10 मार्चला मोहालीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात अनेक चूका केल्या होत्या. ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागले होते. पण आता बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने पंतला पाठिंबा दिला आहे.

बीसीसीआयने एमएस धोनीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी आराम दिला आहे. त्यामुळे रिषभ पंतला 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली. मात्र तो चौथ्या सामन्यात प्रभावित करण्यास अपयशी ठरला.

त्याने चौथ्या सामन्यात ऍलेक्स कॅरे, ऍश्टन टर्नर या फलंदाजांना बाद करण्याच्या संधी गमावल्या. त्यामुळे मैदानात सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांनी ‘धोनी-धोनी’ असे म्हणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पंतवरील दबाव वाढला.  त्याच्या या चुकांवर भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे सोशल मीडियावरही पंतवर मोठ्या प्रमाणात टिका झाली. पण त्य़ानंतर अनेक जणांनी पंतला पाठिंबा देताना त्याला स्थिर होण्यास वेळ द्या असे म्हटले आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचाही समावेश आहे.

सुनील शेट्टीने ट्विट करत पंतला पाठिंबा दिला आहे. त्याने म्हटले आहे की ‘तो आत्ता फक्त 21 वर्षांचा आहे आणि तो भारताचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. जरा विचार करा आपण या वयात काय करत होतो. त्याला संधी द्या. रिषभ तुझ्याकडे चांगली शैली आहे. तूझे लक्ष केंद्रित कर. तू हे करु शकतो.’

सुनील शेट्टीबरोबर, शिखर धवन, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनीही पंतला पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलपूर्वी केकेआरसाठी खुशखबर, या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये मारले ५ षटकार

हिटमॅन रोहित शर्माला तो खास पराक्रम करण्याची अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही…

मुंबईकर अजिंक्य रहाणेने केले शेतकऱ्यांबद्दल भावनिक आवाहन, पहा व्हिडिओ