गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय

आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ लिलावाच्या तयारीला लागला आहे. पण त्याआधीच आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 2019 च्या आयपीएल मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

तो आॅस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळावे म्हणून आयपीएल 2019 च्या काळात इंग्लिश कौउंटी क्रिकेट खेळणार आहे.

मॅक्सवेल शेवटचा कसोटी सामना मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला आॅस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळलेले नाही. त्यामुळे तो कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या इराद्याने लँकेशायर संघाकडून कौउंटी क्रिकेटचा पूर्ण मोसम खेळणार आहे. ज्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये तो सहभागी होणार आहे.

कौउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाकडून आॅस्ट्रेलियाचे जो बर्न्स आणि जेम्स फॉकनर हे दोन खेळाडू खेळतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर आता मॅक्सवेलही या संघाकडून खेळणार आहे.

याबद्दल मॅक्सवेल म्हणाला, ‘स्पष्ट आहे की मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी नाकारणे हा मोठा आणि कठीण निर्णय होता. हा निर्णय सहज घेऊ शकत नाही. पण परत कसोटी खेळण्याचा विचार अजूनही आनंद देतो.’

मॅक्सवेल हा 2018 च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळत होता. पण यावर्षी त्याला दिल्ली संघाने मुक्त केले होते. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 69 सामन्यात 22.9 च्या सरासरीने 1397 धावा केल्या आहेत. तसेच 16 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम