गोव्याचे फ़ुटबॉल वेड

गोवा हे राज्य तसं छोटं, टुमदार असं. पण ह्या राज्याच्या केवळ क्षेत्रफळावर न जाता त्याचे इतर महत्व देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रालगत असलेलं हे राज्य पोर्तुगीज्यांच्या ताब्यात होतं. अनेक वर्ष राज्य केल्यानंतर पोर्तुगीज बाहेर पडले व गोवा हे राज्य १९६१ साली भारतात समाविष्ट झालं. त्याच्या बाकी इतिहासात खोलवर न जाता थेट गोव्याचे खेळावरील प्रेम व त्यामध्ये ही फुटबॉलवरचे प्रेम बद्दल जास्त बोलू.

महाराष्ट्राच्या अगदी लगत असून देखील गोव्याचे मुख्य वेगळेपण म्हणजे फ़ुटबॉल या खेळावरील निस्सीम प्रेम. महाराष्ट्राच्या कोल्हापुरसारखे गोव्यामध्ये  देखील फ़ुटबॉल वेडे चाहते पहायला मिळतात. जागोजागी फुटबॉलची मैदाने हे दृश्य तसं महाराष्ट्रात कमीच, पण इकडे मात्र जो बघावा तो फुटबॉल खेळतो किंवा आवडीने पाहत असतो. नुकतीच गोव्याला जायची संधी मिळाली तेव्हा कलंगुट जवळ ३ मैदाने पहायला मिळाली आणि त्यात एकावर क्लब स्तरावरील सामना बघण्याची संधी मिळाली. लोकांचा एवढ्या साध्या आणि किरकोळ सामन्याला असलेला प्रतिसाद बघून मी अचंबित झालो.

क्रिकेट किंवा इतर खेळाबाबत लोकांची तितकीशी आवड दिसून येत नाही, व या खेळाची आवड पाहता त्याचा चाहतावर्ग दुसरीकडे फिरकेल यावर शंकाच आहे. आणि जेव्हा आयएसएल सारखं एक मोठं व्यासपीठ फुटबॉल प्रेमींच्या समोर येतं तेव्हा गोवा कसा मागे राहील.?? विराट कोहलीच्या एफसी गोवाचा या स्पर्धेत कायम बोलबाला राहिला आहे. या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की गोव्याने फ़ुटबॉलला चक्क डोक्यावर घेतले आहे.