राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: खासदार मेरी कोमचा ‘सुवर्ण’ पंच

गोल्ड कोस्ट| भारताची सुपरमॉम, राज्यसभा खासदार आणि स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज सुवर्ण पदक जिंकले. तिने 45-48 किलो वजनी गटात नॉर्थन आर्यलँडच्या क्रिस्टीना ओहाराला 5-0 ने पराभूत केले.

पाच वेळा विश्वविजेते पद जिंकणारी मेरी कोमने क्रिस्टीनाला अंतिम सामन्यात पाच फेरीत 30-27, 30-27, 29-28, 30-27, 30-27 असे पराभूत केले.

पहिल्या फेरीपासुनच तिचे खेळण्यावर वर्चस्व होते. क्रिस्टीनाला जरी तिच्या उंचीचा फायदा होत असला तरी मेरी कोमची बचावात्मक खेळी उत्कृष्ठ होती. मेरी कोम व क्रिस्टिना ओहारा या दोघींमध्ये अंतिम व निर्णायक सामन्यात एकुण पाच फेऱ्या झाल्या. त्यात मेरी कोमने सर्व फेऱ्यांत आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले.

35 वर्षीय मेरी कोम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. तसेच तिचेही या स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. तीने आजपर्यंत या स्पर्धेत कधीही पदक मिळवले नाही. 

भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ५२पदके मिळवली आहेत. यामध्ये २३ सुवर्ण, १३ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे.