आजपासून गोल्डन एज बॅडमिंटन लीग, व्हेटरन गटातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा

नाशिक । रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमीतर्फे डीव्ही डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने ‘गोल्डन एज बॅडमिंटन लीग’ आजपासून रंगणार आहे. सावरकर नगर, गंगापूर रोड येथील रचना अकादमीच्या बॅडमिंटन कोर्टवर 15 आणि 16 डिसेंबर दरम्यान ही व्हेटरन गटाच्या खेळाडूंसाठी (वयोगट 35+) होणारी ही जीएबीएल स्पर्धेचे दुसरे पर्व आहे.

लीग पद्धतीने खेळली जाणारी नाशिकमधील ही पहिली बॅडमिंटन स्पर्धा असून एकूण सहा संघ एकमेकांशी विजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वात महिला संघाचाही समावेश करण्यात आला आहे. वयवर्षे 30 वर्षावरील 10 महिला खेळाडूंसह एकूण 108 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत विजयी संघ आणि खेळाडूंना 1 लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मराठा वॉरियर्स, हॉटशॉट, सुपर जायंट्स, नाशिक सुपर किंग्ज, निवेक मास्टर्स, डॉल्फिन शटलर्स अशा सहा संघाचा या लीगमध्ये समावेश असणार आहे.

प्रत्येक संघात 18 खेळाडूंचा समावेश असून मुख्य स्पर्धेत 14 खेळाडू तर बोली न लागलेले प्रत्येकी 4 खेळाडू या 6 संघांकडून जंबल डबल प्रकारात खेळतील.

आज (दि. 15) सकाळी साडेआठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस सहा सत्रात स्पर्धा होणार असून रविवारी (दि. 16) संध्याकाळी अंतिम सामने रंगतील.

रचना ट्रस्टच्या सचिव डॉ. शोभा नेरलीकर आणि ट्रस्टी सदस्य अर्चिस नेरलीकर यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले असून राजेश पाथरकर, एम. एस. राणा, अतुल संगमनेरकर, अमित देशपांडे, मनोज शिंदे यांची संयोजन समिती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही स्पर्धा प्रत्यक्ष बघण्यासाठी बॅडमिंटन चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले आहे.

अशी रंगेल जीएबीएल 2018 लीग स्पर्धा :

लीग पद्धतीने खेळली जाणारी नाशिकमधील पहिलीच स्पर्धा
व्हेटरन्स खेळाडूंसाठी आयोजित विशेष स्पर्धा
एक लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे
6 संघात नाशिक जिल्ह्यातील 108 खेळाडू
सहा प्रशिक्षक एकमेकांशी भिडणार

असे आहेत 6 संघ
मराठा वॉरियर्स
हॉटशॉट
सुपर जायंट्स
नाशिक सुपर किंग्ज
निवेक मास्टर्स
डॉल्फिन शटलर्स

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव

सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का