अखेर गोन्झालो हिग्नेइनने जुवेंट्स सोडून एसी मिलॅन क्लबमध्ये प्रवेश केला

आजच्या ट्रान्सफर विंडोमध्ये जुवेंट्स आणि एसी मिलॅन क्लब्सने एक खेळाडू गमावला तर दुसरा संघात घेतला आहे.

गोन्झालो हिग्नेइन याने शेवटी जुवेंट्सला सोडून ए सी मिलॅन क्लबमध्ये तर मिलॅनचा डिफेंडर लियोनार्दो बोनूसीने परत जुवेंट्स क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

तसेच जुवेंट्सचा डिफेंडर मॅटीया कॅलदारा पण मिलॅनमध्ये गेला. कॅलदाराला जुवेंट्सने 2017मध्ये करारबद्ध केले होते. पण तो जुवेंट्सकडून एकही सामना खेळला नाही.

30 वर्षीय, हिग्नेइन हा 20.85 मिलियन डॉलरच्या लोनमध्ये एका हंगामासाठी संघात गेला असून हा हंगाम संपल्यावर त्याला क्लबमध्ये कायम केले जाणार आहे.

तर दुसरीकडे बोनूसीला जुवेंट्स क्लबने 40.58 मिलियन डॉलरमध्ये परत क्लबमध्ये घेतले आहे. 2010-17 या काळात तो जुवेंट्सकडून 227सामने खेळला यामध्ये त्याने 13 गोल केले. 2017-18 या कालावधीत त्याने मिलॅनकडून 33 सामन्यात 2 गोल केले.

हिग्नेइन याने इटलीतील सेरी एमध्ये 36 गोल केल्याने जुवेंट्सने त्याला 2016 मध्ये 90 मिलियन डॉलरला करारबद्ध केले. जुवेंट्सकडून खेळताना त्याने 105 सामन्यात 55 गोल केले.

अर्जेंटिनाच्या या 30 वर्षीय फुटबॉलपटूचे स्थान क्रिस्तियानो रोनाल्डो संघात आल्यापासूनच धोक्यात होते. तसेच त्याचा एंजट आज ए सी मिलॅन आणि जुवेंट्स या संघाना भेटला.

चाहत्यांच्या मते त्याने महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. 2018च्या फिफा विश्वचषकातही तो तीन सामने खेळला. यातील स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तो संघात होता. तर बाकीच्या दोन सामन्यामध्ये बदली खेळाडू म्हणून खेळला.

जुवेंट्सने सेरी ए चे मागील सातही विजेतेपद जिंकले असून एसी मिलॅन यांनी 2011मध्ये हा कप जिंकला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

माफीच्या व्हिडिओमधून नेमारने कमावली एवढी रक्कम

इंडियन सुपर लीग: हे आहेत दिल्ली डायनामोजचे नवीन प्रशिक्षक