महाराष्ट्रातील कबड्डी प्रेमींसाठी आनंदाची बातमी.

महाराष्ट्रातील मराठी कबड्डी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की प्रो कबड्डी सीजन ७ हे “स्टार स्पोर्ट्स 1 मराठी” या नवीन चॅनल वर दिसणार आहे. त्याचा समालोचन हे मराठी असणार आहे. प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै पासून सुरुवात होते आहे.

अनेक दिवसांपासून क्रीडा चाहते मराठी स्पोर्ट्स चॅनल साठी स्टारला विनंती करत होते. अखेर स्टार स्पोर्ट्स कडून नवीन चॅनल “स्टार स्पोर्ट्स 1 मराठी” १५ जुलै २०१९ रोजी सुरू होत आहे.

कबड्डी खेळ ही महाराष्ट्राची मोठी ओळख आहे. प्रो कबड्डी नंतर कबड्डी रसिकांचे प्रमाण वाढले आहे. या आधी प्रो कबड्डीचा प्रेक्षपण मराठीत स्टार प्रवाह झालं होतं. पण ते पूर्ण वेळ नव्हतं. आता महाराष्ट्रातील कबड्डी रसिक आपल्या मराठी भाषेत कबड्डीचा आनंद घेऊ शकतील.