मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घेऊन येतोय ‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पिअनशिप’ मोबाईल गेम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच त्याची सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन नावाची गेम लाँच करणार आहे. याबद्दल त्याने ट्विटरवरून सर्वांना माहिती दिली. सचिनच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

सचिनने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात म्हटले आहे की, उत्सुकतेने वाट पाहत असलेलली आपल्या देशातील क्रिकेट गेम लवकरच लाँच होत आहे.

याबरोबरच सचिनने ट्विटमध्ये लिहिले आहे की “माझ्या सचिन सागा क्रिकेट गेम लाँच होण्यासाठी फक्त १५ दिवस राहिले आहेत. मी उत्सुक आहे. तुम्हीं उत्सुक आहेत का?”

सचिन १५ दिवसांनी म्हणजे ७ डिसेंबर रोजी हा गेम लाँच करणार आहे. सध्या गूगल प्ले या ऍप्लिकेशनवर ही गेम पूर्व नोंदणीसाठी उपलब्ध आहे.

आता खुद्द सचिनच गेम लाँच करणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.