आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गुगलच अप्रतिम ‘डुडल’

आयपीएलसाठी ट्विटरने खास बनवलेल्या ईमोजीच्या पाठोपाठ आता गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिन वेबसाइटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अप्रतिम असं डुडल बनवलं आहे.

आज चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होत असल्या कारणाने हे खास डूडल गुगलने बनवले आहे. या वेबसाईटवर दिसणाऱ्या या डुडलवर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला त्यावर क्रिकेटसुद्धा खेळता येत.

इथे पहा गुगल डुडल: https://www.google.co.in/
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गुगलच अप्रतिम डुडल PC: Google

आपण नेहमी कोणत्याही डुडलवर क्लिक केलं तर आपल्याला एखादा माहितीपर लेख पहायला मिळतो. परंतु हे डुडल पूर्णपणे वेगळं असून या जागी आपण क्रिकेटची गेम खेळू शकतो.

तुम्हाला या गेममध्ये फक्त बॅट फिरवायची असून तुम्ही फटकावलेला चेंडू कुठे जातो हे पहायचं आहे.

विशेष म्हणजे गुगलने दावा केला आहे की ही डुडल गेम अतिशय कमी इंटरनेट स्पीडमध्ये सुद्धा चालेल.

गुगल डुडल हे मुख्यतः जगात मोठी कामगिरी केलेल्या महान व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस किंवा ऐतिहासिक दिवशी वेबसाइटवर पाहायला मिळतात. क्रिकेटच्या या मिनी विश्वचषकच डुडल बनवून या मोठ्या वेबसाइटने क्रिकेटचा मोठा सन्मानच केला आहे.