माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन

बेंगलोर |  गुरूवार पासून सुरू झालेल्या भारत-अफगानिस्तान पहिल्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सहा गड्यांच्या मोबदल्यात  347 धावापर्यंत मजल मारली आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामिवीर शिखर धवनने शतकासह एक खास विक्रम आपल्या नावे केला. पहिल्या दिवसाच्या खेळात उपहारापूर्वी शतक करनारा तो पहिला भारतीय फलंदाज बनाला आहे.

आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अफगानिस्तानने सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांवर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव टाकला होता. गेल्या काही दिवसातील अफगानिस्तान संघाच्या व खासकरून फिरकी गोलंदाज रशिद खानच्या कामगिरीमुळे भारतीय फलंदाज चिंतेत होते.

पण याला अपवाद ठरला तो शिखर धवन. शिखर धवनने पहिल्या दिवशीच्या खेळातील पहिल्या सत्रात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले.

“मी आणि रशिद आयपीयलमध्ये एकाच संघांकडून खेळत असल्याचा मला खूप फायदा झाला. गेली दोन वर्षे आम्ही एकत्र खेळत असल्याने मी नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीवर खूप फलंदाजी केली आहे त्यामुळे आज त्याची गोलंदाजीवर खेळताना काही अडचण आली नाही.” असे भारताचा तडाखेबाज सलामिवीर शिखर धवन पहिल्या दिवसाच्या खेळातंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग

इंग्लंड क्रिकेटच्या चाहत्यांमुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू वैतागले