त्या चेंडूवर तर सचिन-ब्रॅडमनही झाले असते १०००वेळा आऊट

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वानच्या मते मिचेल स्टार्कने जेम्स व्हिन्सला टाकलेल्या चेंडूवर जगातील कोणताही फलंदाज बाद होऊ शकतो. स्वानने या चेंडूचे जोरदार कौतुक केले आहे.

“सचिन तेंडुलकर, दोन ब्रॅडमन आणि स्टिव्ह स्मिथसुद्धा १००० पैकी १०००वेळा त्या चेंडूवर बाद होऊ शकतात. ” असे स्वानने एएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले.

त्या चेंडूला एक अतिशयोक्ती म्हणणाऱ्यांना क्रिकेट कळत नाही असेही तो पुढे म्हणाला.

Video: पाहा शतकातील सर्वात जबरदस्त चेंडू, विन्सच्या दांड्या गुल

पर्थ । काही क्रिकॆप्रेमींच्या मते तो ॲशेस मालिकेत आजपर्यंतचा सर्वात चांगला चेंडू आहे तर काहींच्या मते तो २१व्या शतकातील सर्वोत्तम चेंडू.

काहीही असो परंतु आज मिचेल स्टार्कच्या चेंडूने जेव्हा जेम्स विन्सच्या दांड्या गुल केल्या तेव्हा तो चेंडू नक्कीच नेहमीप्रमाणे सामान्य नव्हता एवढे नक्की.

आज मिचेल स्टार्क जेव्हा ९० मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता तेव्हा इंग्लंडच्या उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या जेम्स विन्सला स्टार्कच्या एका चेंडूचा अजिबात अंदाज आला नाही.

जेव्हा स्टार्कने हा चेंडूचा टप्पा पडला तेव्हा विन्सने त्याचा अंदाज घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडूने टप्पा घेतल्यावर तो इतका वळला की बॅटची कड सुद्धा त्यापासून बरीच दूर राहिली आणि चेंडूने यष्टीचा वेध घेतला.

विन्सला अजिबात वाटले नाही की हा चेंडू एवढा वळेल आणि जेव्हापर्यंत तो यातून सावरालाही नव्हता तोपर्यंत चेंडूचा यष्ट्यांवर आदळण्याचा आवाज आला होता.