Video: असे झाले भारतीय संघाचे तिरुवनंतपुरममध्ये जंगी स्वागत

तिरुवनंतपुरम । क्रिकेटवेड्या भारतीय देशात चाहते अगदी रात्रीच्या १-२ वाजताही आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंची झलक पाहण्यासाठी विमानतळ किंवा संघाच्या हॉटेलबाहेर उभे असतात. 

याचा प्रत्यय गेल्याच महिन्यात जेव्हा भारतीय संघ पुण्यात आला तेव्हा आला होता. आता पुन्हा असाच काहीसा अनुभव भारतीय संघाला तिरुवनंतपुरममध्ये आला आहे. 

रात्रीच्या १२ वाजून ३० मिनिटांनी संघ येथील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला आणि तेव्हाही चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होते. अनेक जण इंडिया- इंडिया, विराट-विराट अशा घोषणा देत होते. 

यावर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही एक खास ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चाहत्यांच्या या प्रेमावर विश्वास बसत नसल्याचे सांगितले आहे. 

भारत विरुद्ध न्यूझीलँड टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत असून येथे होणार तिसरा सामना मालिकेतील विजयी संघ कोण हे ठरवणार आहे.