T20: पावसामुळे नाणेफेकीला विलंब

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा आल्यामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे. सामना सुरु होण्यासाठी मैदान कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.

बीसीसीआयने याचे अधिकृत ट्विट केले आहे. 

माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात म्हटले आहे की पाऊस थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे निराशा होऊ शकते.

 

हे भारतातील १९वे मैदान असेल ज्यावर आंतरराष्ट्रीय टी २०सामना होईल .