इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत टायगर्स, आर्यन स्कायलार्कस, आर स्टॅलियन्स, जीएससी पँथर्स संघांचे विजय    

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत टायगर्स, आर्यन स्कायलार्कस, आर स्टॅलियन्स व  जीएससी पँथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अभिषेक ताम्हाणेच्या जलद नाबाद 47 धावांच्या बळावर टायगर्स संघाने ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 6षटकात बिनबाद 68धावा केल्या यात रवी कासटने नाबाद 38 तर राजेश कासटने नाबाद 22 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 68 धावांचे लक्ष टायगर्स संघाने अभिषेक ताम्हाणे 19 चेंडूत नाबाद 47 धावांच्या जोरावर 5.4षटकात 1 बाद 70धावांसह पुर्ण  करत विजय मिळवला. अभिषेक ताम्हाणे सामनावीर ठरला.

दुस-या सामन्यात जयदीप गोडबोलेच्या  31 धावांसह आर्यन स्कायलार्कस संघाने सुपर लायन्स संघाचा 13 धावांनी पराभव केला.

अन्य लढतीत आशिष देसाईच्या नाबाद 22 आर स्टॅलियन्स संघाने गोखले सिनर्जी कोब्राज संघाचा 9 गडी राखून पराभव केला. तर नंदन डोंगरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रेड बुल्स संघाने गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाचा 7 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. हर्ष जैन नाबाद 17धावांच्या जोरावर जीएससी पँथर्स संघाने रेड बुल्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

रेड बुल्सल 6षटकात 3बाद 65धावा(अमित परांजपे नाबाद 35(19,2×4,2×6), तन्मय चोभे 10, राहुल गांगल  2-12)पराभूत वि. जीएससी पँथर्स: 4.4 षटकात 3बाद 67धावा(कर्ना मेहता 18(8,2×4,1×6), हर्ष जैन नाबाद 17(9,1×4,1×6), सिद्धार्थ बदामीकर 13(7,1×6), तुषार नगरकर 1-11, नंदन डोंगरे 1-8, तन्मय चोभे 1-10)सामानावीर- हर्ष जैन

ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 6षटकात बिनबाद 68धावा(रवी कासट नाबाद 38(18, 5×4, 1×6), राजेश कासट नाबाद 22(19, 2×4), ) पराभूत वि.टायगर्स: 5.4षटकात 1 बाद 70धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 47(19, 4×4, 3×6), मधुर इंगळहालीकर 12(17), राजेश कासट 1-8);सामनावीर-अभिषेक ताम्हाणे;

आर्यन स्कायलार्कस: 6षटकात 6बाद 66धावा(जयदीप गोडबोले 31(12, 4×6), अंकुश जाधव 8, आशिष राठी 1-8, श्री शिरोडकर 1-10, कल्पक पत्की 1-13)वि.वि.सुपर लायन्स: 6षटकात 3बाद 53धावा(श्री शिरोडकर 23(17, 3×4, 1×6),  रिषभ गडीया 12(10), सोहन आंगळे 1-6, अनिरुद्ध सानप 1-9, आदित्य गांधी 1-16);सामनावीर-जयदीप गोडबोले;

गोखले सिनर्जी कोब्राज: 6षटकात 3बाद 56धावा(योगेश भोनले 36(20, 4×4, 3×6), विक्रांत पाटील नाबाद 9, रोहित बर्वे 1-5, हर्षद बर्वे 1-8)पराभूत वि.आर स्टॅलियन्स: 5.3षटकात 1बाद 57धावा(आशिष देसाई नाबाद 22(14,2×4), हर्षद बर्वे 21(15, 3×4), रोहित बर्वे नाबाद 9, विशाल गोखले 1-14);सामनावीर-आशिष देसाई;

रेड बुल्स: 6षटकात 4बाद 55धावा(अमित परांजपे 16(7, 2×6), तन्मय चोभे 14(11), नंदन डोंगरे 14, रोहन छाजेड 1-2, अनिल छाजेड 1-10, अश्विन शहा 1-16) वि.वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6षटकात 7बाद 48धावा(अश्विन शहा 23(15, 1×4, 1×6), नंदन डोंगरे 2-2, समीर जोशी 1-7, अमित परांजपे 1-6, तन्मय चोभे 1-8);सामनावीर-नंदन डोंगरे.