आयपीएल २०१८ मध्ये नसतील पुणे, गुजरातचे संघ, तरीही एकूण संघ असतील १०

 

आयपीएल २०१८ मध्ये पुणे, गुजरातचे संघ नसतील असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी काल दिल्ली येथे पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट केले.

जर पुढील वर्षी १० संघ आयपीएलमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला तरीही त्यासाठी नव्याने बोली लावल्या जातील. पुणे आणि गुजरात संघाला संधी दिली जाणार नाही. तसा तो दोन वर्षांचा करारच या संघांबरोबर झाला आहे. असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि गुजरात या दोन्ही संघाना आयपीएल मधून ८ मोसमांनंतर निलंबित केलेल्या चेन्नई आणि राजस्थान संघाच्या जागी फक्त २ वर्षांसाठी स्थान दिले होते. पुढील वर्षी ते दोनही संघ पुन्हा आयपीएलमध्ये सामील होतील.

त्यामुळेच पुणे आणि गुजरात संघाचे चाहते हे संघ पुढील आयपीएलमध्ये पाहू शकणार नाही. तसा इशाराच आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिला आहे.

२०१८ च्या आयपीएल मोसमापुर्वी सर्व संघांना नव्याने आयपीएल लिलावाला सामोरे जावे लागणार आहे. आयपीएल कराराप्रमाणे १० मोसमानंतर सर्व खेळाडूंसाठी नव्याने बोली लावली जाणार आहे.
शुक्ला पुढे म्हणाले, “आयपीएल २०१८ मध्ये खेळाडूंचा लिलाव मोठ्या प्रमाणावर होणार आहे. परंतु त्याला आता बराच वेळ आहे. कारण आम्ही तो लगेच न करता आयपीएल २०१८ ला काही दिवस बाकी असताना करणार आहोत.”
ह्या वर्षी टायटल स्पॉन्सर्स असलेल्या विवोचा करारही २०१७ आयपीएल नंतर संपणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी नवीन करार होईल. हा करार इ- करारअसेल.