टीम न्यूझीलंडची घोषणा, १० महिन्यांनी द्विशतकवीर खेळाडू करतोय पुनरागमन

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत 3 वनडे सामने होणार आहेत.

या संघात वनडेतील द्विशतकवीर मार्टिन गप्टीलचे पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवसांपासून पोटरीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याबरोबरच अष्टपैलू जेम्स निशाम आणि वेगवान गोलंदाज डॉग ब्रेसवेल यांचाही न्यूझीलंडच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

तसेच टिम सिफर्टचा पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. निशाम, ब्रेसवेल आणि सिफर्ट यांचा कॉलीन डी ग्रँहोमआजाझ पटेल आणि टॉम लॅथम ऐवजी संघात समावेश करण्यात आला आहे. 

लॅथम आणि ग्रँडहोम यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंड मायदेशात खेळणार असल्याने ब्रेसवेल याचा पटेल ऐवजी वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषकासाठी आता फक्त जवळजवळ पाचच महिने शिल्लक असल्याने त्या दृष्टीने न्यूझीलंड संघबांधणीची तयारी करत आहे. विश्वचषकाआधी न्यूझीलंड मायदेशात 11 वनडे सामने खेळणार आहे. यामध्ये ते श्रीलंका, भारत आणि बांगलादेश विरुद्ध सामने खेळणार आहेत.  

श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ – 

केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, कॉलिन मुनरो, जिमी नेहेम, हेन्री निकोलस, टीम सिफर्ट, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर.

महत्त्वाच्या बातम्या:

त्या एका गोष्टीसाठी रोहितला पहावी लागली ३६१ दिवस वाट

धोनीला डच्चू पक्का होता, परंतु या कारणामुळे झाली निवड

चुकीला माफी नाही? मयांक अगरवालची त्या व्यक्तीने मागितली माफी