अग्रमानांकित सिमोना हालेप फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत

पॅरिस । ड्लब्लुटीए क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या तसेच स्पर्धेत अव्वल मानांकन प्राप्त झालेल्या सिमोना हालेपने फ्रेंच ओपन २०१८ची उपांत्यपुर्व फेरी गाठली आहे. तिने एलिस मॅट्रिन या १६व्या मानांकित खेळाडूवर ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

दोनवेळच्या उपविजेत्या हालेपने दोन्ही सेटमध्ये एलिस मॅट्रिनला कोणतीही संधी दिली नाही. रोमानियाच्या हालेपने या सामन्यात तब्बल ६ वेळा एलिस मॅट्रिनची सर्विस भेदली.

उपांत्यफेरीत प्रवेश करणारी ती यावर्षीची पहिली खेळाडू ठरली आहे. आता तीचा उपांत्यपुर्व फेरीचा सामना कॅरोलीन ग्रसिया आणि अॅजेलिक कर्बर यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होईल.

हालेपने आजपर्य़ंत दोनवेळा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत गाठली आहे. २०१४ आणि २०१७मध्ये तिला येथे पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गेले अनेक महिने अव्वल स्थानी असलेल्या हालेपला आजपर्यंत एकही ग्रॅंडस्लम मात्र जिंकता आले नाही. यावर्षीही ती आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीच पोहचली होती. मात्र तेथेही तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते.