ब्रेकिंग : जखमी फिंचच्या जागी हॅंड्सकोम्बला केले ऑस्ट्रेलियाने पाचारण

चेन्नई । ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचच्या जागी पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका रविवारपासून सुरु होत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी घोषित झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात पीटर हॅंड्सकोम्बचा समावेश नव्हता. सरावादरम्यान ऍरॉन फिंच जखमी झाल्यामुळे हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे.

ज्या वेळी सरावादरम्यान फिंच जखमी झाला तेव्हा तो केवळ पहिले एक -दोन सामने तो संघाबाहेर राहील अशी शक्यता होती परंतु ही जखम गंभीर असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण केले आहे.