हॅप्पी बर्थडे माही…!!!

आज आपल्या लाडक्या माहीचा म्हणजेच महेंद्र सिंह धोनीचा वाढदिवस आहे. धोनी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शांत स्वभवाचा ,हुशार,आक्रमक फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक. धोनीने आपल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या सर्वोच शिखरावर नेऊन ठेवले. भारतात सचिन तेंडुलकर नंतर सर्वात जास्त चाहता वर्ग हा धोनीचाच आहे.

धोनी नावाच्या वादळाचा जन्म हा रांची,बिहार(झारखण्ड) येथे १९८१ साली झाला. डिसेंबर २००४ साली बांग्लादेश विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीने पदार्पण केले.पहिली कसोटी तो एका वर्षांनतर श्रीलंकविरुद्ध खेळला.

धोनी हा एक आक्रमक पण शांत स्वभावाचा फलंदाज आहे. सामन्याच्या परिस्थितीप्रमाणे धोनी आपल्या फलंदाजीत सतत बदल करत असतो. धोनी हा शक्तिशाली हिटरदेखील आहे. धोनीचे अव्वल दर्जाचे यष्टीरक्षण बघून अनेकांना अक्षरशः तोंडात बोट घालावी लागलीत. विजेचा वेगाने धावबाद आणि सर्वोत्तम यष्टीरक्षण करण्यासाठी धोनी जगप्रसिद्ध आहे. आजच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे.

महेंद्र सिंह धोनीने आपल्या नेतृत्वामध्ये भारताला २००७ साली आयसीसी टी२० विश्वचषक, सीबी सीरीज२००७-०८, एशिया कप २०१०, २०१३ ची चॅम्पियन ट्राफी आणि क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा २०११ सालचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकवून दिला. २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने ७९ चेंडूत नाबाद ९१ धावांची आक्रमक खेळी करून भारताला विश्वविजयी बनवले.सचिन तेंडुलकर म्हणजेच क्रिकेटच्या देवाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले.
२००९ मध्ये धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ पाहिल्यादाच टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचला. पुढे धोनीची विजयगाथा अशीच सुरु राहिली. २०१३ साली धोनीच्या नेतृत्वामध्ये ४०वर्षनंतर भारत हा पहिला संघ बनला की ज्याने ऑस्ट्रेलियाला टेस्ट मध्ये व्हाइट-वॉश देण्याचा महापराक्रम केला. धोनीने डिसेंबर २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

धोनीला त्याच्या यशस्वी कारकिर्दीत अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले त्यात २००८ आणि २००९ मध्ये आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ़ द इयर (दोन वेळा हा ‘किताब जिंकणारा पहिलाच खेळाडू), २००७ साली राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार आणि पदम्श्री, २००९ च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट इलेवन आणि आयसीसी वर्ल्ड ओडीआय इलेवनच्या कर्णधारपदाचा मानही माहीला मिळाला.

धोनी हा भारताचा आतापर्यंत सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.अफाट प्रसिद्धी मिळूनही धोनी कधी एक गर्विष्ठ खेळाडू किंवा व्यक्ती झाला नाही. भारतीय क्रिकेटसाठी धोनीच योगदान हे अन्यसाधाराण आहे. क्रिकेटमद्ये येणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूला धोनी हा एक प्रेरणास्रोत असेल. अशा ह्या सगळ्यांच्या लाडक्या कॅप्टन कूल माहीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– सचिन आमुणेकर (टीम महा स्पोर्टस )