वाढदिवस विशेष- लसिथा मलिंगाबद्दल माहित नसलेल्या ५ खास गोष्टी

आज श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाचा ३५वा वाढदिवस. मलिंगाचा जन्म २८ आॅगस्ट १९८३ रोजी श्रीलंकेतील गाॅल येथे झाला.

त्याने श्रीलंकेकडून ३० कसोटी सामन्यात १०१ विकेट्स, २०१४ वनडेत ३०१ विकेट्स तर ६८ टी२०मध्ये ९० विकेट्स अशा एकुण ४९२ विकेट्स घेतल्या आहेत.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा लंकेचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अशा या दिग्गज खेळाडूबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी-

१. मलिंगाने क्रिकेट खेळायला वयाच्या ११व्या वर्षी सुरुवात केली. तो गाॅलजवळ असलेल्या रथगामा येथे त्याने क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. तो आधी टेनिस बाॅलने क्रिकेट खेळायचा परंतु नंतर त्याने लेदरवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

२. वयाच्या १७व्या वर्षी मलिंगाने गाॅलवर आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटला प्रारंभ केला. २००१मध्ये झालेल्या या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या. याच सामन्यात तो जेहान मुबारक आणि प्रसन्ना जयवर्धेनेबरोबर खेळला होता. पुढे हे खेळाडू त्याचे राष्ट्रीय संघात संघसहकारी झाले.

३. पदार्पणापुर्वी त्याला श्रीलंकन खेळाडूंना नेटमध्ये सरावासाठी पाचारण करण्यात आले परंतु त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज जखमी झाल्याने गोलंदाजी करण्यापासून त्याला रोखण्यात आले.

४. सुरुवातीच्या काळात चंपका रामनायके आणि रुमेश रत्नायके हे त्याचे प्रशिक्षक होते. त्यांनी मलिंगाची गोलंदाजीची शैली बदलण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्यात ते अयशस्वी ठरले. अखेर आहे त्याच शैलीत त्यांनी मलिंगा घडविण्याचे ठरविले.

५. २००७ क्रिकेट विश्वचषकात मलिंगाने आपल्या केसांना वेगळ्या प्रकारचा रंग दिला. हीच त्याची पुढे स्टाईल बनली. तेव्हा त्याला क्रिकेट विश्वातील सर्वात sexiest man in cricket असा पुरस्कार बार्बाडोसमधील एका मासिकाने दिला होता.

६. मलिंगाने ७ फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ वेळा बाद केले आहे. त्यात सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, शाहिद आफ्रिदी, शेन वाॅटसन यांचा समावेश आहे.

७. मलिंगाने ९व्या विकेटसाठी वनडेत अॅंजेलो मेथ्थ्वुबरोबर १३२ धावांची भागीदारी केली होती. २०१०ला आॅस्ट्रेलियातील मेलबर्न वनडेत ८ बाद १०७ वरुन २३९ धावांवर ही भागीदारी नेली होती. जिंकायला एक धाव बाकी असताना तो ५६ धावांवर बाद झाला. पुढे मुथय्या मुरलीधरनने वाॅटसनला चौकार मारत हा सामना श्रीलंकेला जिंकुन दिला होता.

८.वनडेत तीन हॅट्रिक घेणारा मलिंगा जगातील एकमेव गोलंदाज आहे. त्यातील दोन हॅट्रिक ह्या त्याने विश्वचषकात घेतल्या आहेत. २००७ विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या. २०११विश्वचषकात त्याने केनियाविरुद्ध कोलंबोला पुन्हा हॅट्रिक घेतली होती. तर त्याच वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्याने तिसरी हॅट्रिक साजरी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान

प्रो कबड्डीच्या वेळापत्रकाच स्वरुप, जाणून घ्या अगदी सोप्य पद्धतीने

एकेकाळी इंग्लंडमध्ये धावांसाठी महाग झालेला कोहली मोडणार द्रविड- गावसकरांचे विक्रम

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे