दिग्गजांनी दिल्या मोहम्मद कैफला ३७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज भारताचा दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफचा ३७वा वाढदिवस. कैफ भारताकडून १२५ वनडे तर १३ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने दोन्ही प्रकारात ३२च्या पुढे सरासरी राखत अनुक्रमे २७५३ आणि ६२४ धावा केल्या आहेत.

अशा या खेळाडूला अनेक दिग्गजांनी ट्विटर व अन्य माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही खेळाडूंनी तर जुन्या आठवनींना उजाळाही दिला आहेत. त्यात विशेष करून नेटवेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्याचा खास समावेश आहे.

कैफचे एकवेळचे संघासहकारी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, हरभजन सिंग व युवराज सिंगचा समावेश आहे.