सौरव गांगुलीला दिल्या दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिग्गज क्रिकेटपटूला जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास फोटो शेअर करून गांगुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये सेहवाग, कैफ, रैना या दिग्गजांचाही समावेश आहे.