वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?

आज भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा ४९ वा वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाकिस्तानी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या प्रसादने ३३ कसोटीत ९६ विकेट्स तर १६१ वनडेत १९६ विकेट्स घेतल्या आहेत.

अशा या भारताच्या वेगवान गोलंदाजाविषयीच्या खास गोष्टी-

-प्रसादचा जन्म ५ आॅगस्ट १९६९ला कर्नाटकमधील बेंगलोर येथे झाला.

-त्याचे पूर्ण नाव बापू कृष्णराव वेंकटेश प्रसाद असे आहे.

-त्याने भारताकडून २ एप्रिल १९९४ रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर २ वर्षांनी जून १९९६ला त्याने भारताच्या कसोटी संघातही स्थान मिळवले.

-त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४ विकेट्स तर दुसऱ्या डावात २ विकेट्स अशा मिळून एकूण ६ विकेट्स मिळवल्या.

-प्रसाद हा १९९९ साली चेन्नई येथे झालेल्या पाकिस्थान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शून्य धावा देत घेतलेल्या ५ विकेट्ससाठी ओळखला जातो. या डावात त्याने एकूण ३३ धावात घेतलेल्या ६ विकेट्स घेतल्या होत्या.

-प्रसादला २००० साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

-त्याने भारताचे १९९४ ते २००१ असे ७ वर्षच प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याला दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

-प्रसादने १९९९ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध अमिर सोहिलची घेतलेली विकेट प्रसिद्ध आहे. सोहिलने बाद होण्याआधीच्या चेंडूवर चौकार मारला होता आणि प्रसादला ज्या बाजूला चौकार मारला तिकडे बॅट दाखवत डिवचले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला त्रिफळाचीत केले होते.

-निवृत्तीनंतर मे २००९च्या बांगलादेश दौऱ्यासाठी प्रसादची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली होती.

– त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

-त्याने २०१४ ला प्रदर्शित झालेल्या सचिन! तेंडुलकर अल्ला या कन्नड चित्रपटात काम केले आहे.

-ते युवा भारतीय संघाच्या निवड समितीचे फेब्रुवारी २०१८ पर्यंत अध्यक्ष होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय गोलंदाज म्हणतो मी इंग्लंडमध्ये आनंद लुटायला आलोय

बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडीयाला दिला त्रास

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक!