टॉप ५: विराटने कारकिर्दीत केलेले महत्वाचे ५ विक्रम

विराट कोहलीचा आज २९वा वाढदिवस. त्यानिमित्त हे विराटाचे कारकिर्दीतील महत्वाचे ५ विक्रम

-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ३२ शतकांसह दुसरा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह अव्वल

-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १९४३ धावांसह दुसरा. ब्रेंडन मॅक्क्युलम २१४० धावांसह अव्वल

-ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ७००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू

-वनडेत वेगवान ९००० धावा करणारा खेळाडू. १९४ डावात केला हा विक्रम

-वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक शतके. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १४ शतकांचा विक्रम मोडला.