हॅप्पी बर्थडे विराट …!!!

आपल्या भारत देशात क्रिकेट या खेळाला फक्त खेळ नाही तर एक धर्म मानला जातो आणि या धर्माचे चाहतेही अगणित आहेत. भारतात जन्म घेतलेला प्रत्येक मुलगा हा मोठा होऊन क्रिकेटर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठा होतो.असाच एक विराट कोहली नावाच्या युवा खेळाडूने भारतिय क्रिकेटमध्ये धडक दिली आणि बघता बघता तो भारतीय क्रिकेटचा चेहरा बनून गेला. मी तर म्हणेन भारतात क्रिकेट नावाच्या धर्मावर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवणारा एकमेव राजा म्हणजे विराट कोहली.

भारतीय संघाचा कर्णधार आणि आपल्या नावाप्रमाणेच विराट आणि वादळी खेळीसाठी प्रसिद्ध असलेला विराट कोहलीचा आज २९ वा वाढदिवस.यानिमित्ताने अनेक मातब्बर क्रिकेटपटूंनी,चाहत्यांनी आज विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विराटने आपल्या ९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम मोडीत काढले.आपल्या आक्रमक खेळीने त्याने वेगळी ओळख निर्माण केली.५ नोव्हेंबर १९८८ साली दिल्लीमध्ये जन्म झालेल्या विराटने २००८ साली श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आपले पदार्पण केले होते. त्याआधी विराटने आपल्या नेतृत्वात भारताला १९ वर्षखालील विश्वचषक मिळवून दिला होता.

विराटने आतापर्यंत भारतासाठी खेळताना ६० कसोटी सामन्यांत ४६५८ धावा केल्या, यात १७ शतकांचा तर १४ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ सामन्यांत ३२ शतकं आणि ४५ अर्धशतकांच्या जोरावर आतापर्यंत ९०३० धावा केल्यात. विराटने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा भारतीय संघाला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढून विजय मिळवून दिला आहे.

मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विराटने जगभरातील करोडो चाहत्यांना भूरळ पाडलीय.सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, आणि राहुल द्रविड यांच्यानंतर विराटला भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मान्यता मिळाली.गेली अनेक वर्षे सचिन तेंडुलकरचे विक्रम कोण मोडू शकतं या प्रश्नाला उत्तर नव्हत पण आज विराटच्या रुपात ते उत्तर अपल्यासमोरआहे असं म्हणण्यात काही हरकत नाही.ज्या गतीने विराट सध्या खेळतोय त्याच गतीने तो पुढे खेळत राहिला तर सचिनचे विक्रम विराट नक्कीच तोडू शकतो.सचिनलाही जेव्हा विचारल की तुझा वारसदार कोण तर त्यानेही रोहित शर्मा आणि विराटकडेच बोट दाखवल होत.

आपल्या आक्रमक खेळीने आणि विशिष्ट नेतृत्वागुणांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिके मध्ये भारताचा डंका वाजवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला २९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

-सचिन आमुणेकर