श्रीलंकेचा पहिला डाव १८३ वर संपुष्टात, भारताला ४३९ धावांची मोठी आघाडी

0 46

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मोठी आघाडी मिळाली आहे. लंकेचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्टात आला.

भारतीय माऱ्यापुढे एकही लंकन खेळाडू विशेष तग धरू शकला नाही. आज फिरकी गोलंदाजांबरोबर वेगवान गोलंदाजही चमकले. आज सकाळच्या सत्रात श्रीलंकेच्या ८ विकेट्स पडल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाजात अश्विनने ५ जडेजाने २ उमेश यादव १ आणि मोहम्मद शमी २ यांनी विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेकडून निरोशन डिकवेल्लाने सर्वोच्च धावसंख्या उभारताना ५१ धावांची खेळी केली.

भारताने पहिल्या डावात एवढी मोठी आघाडी घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: